पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ मधील शिवसैनिकांना धर्मवीर चित्रपट दाखवण्यात आला. सचिन प्रभाकर सानप (शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड) यांच्या वतीने धर्मवीर चित्रपटाच्या प्रीमियर शो चे आयोजन केले होते. या चित्रपटाला प्रभागातील ४०० नागरिकांनी लाभ घेतला.

धर्मवीर चित्रपटाच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक रामभाऊ उबाळे यांचा सत्कार करण्यात आला. करोना नंतर सर्व चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. त्यामुळे महिलांना सहकुटुंब मनोरंजनाचा आनंद घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना जिल्हा संघटिका सौ.सुलभाताई उबाळे, शिवसेना शहर संघटक सचिनदादा सानप, शिवसेना नेते रामभाऊ उबाळे युवा सेना भोसरी विधानसभा अधिकारी अमित शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत कन्हेरे, शिवानंद चौघुले (सामाजिक कार्यकर्ते), गजानन ढमाले (उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी चिंचवड शहर),अरुण बागडे (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी चिंचवड शहर), युवा सेना भोसरी विधानसभा चिटणीस स्वप्नील शिरसाठ, राहुल ठाकरे, दत्तात्रेय दुवा, मधुकर सोनवणे, विनोद डोरले आदी सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रभागातील जनतेसाठी असे मनोरंजन व विकासात्मक उपक्रम सचिन प्रभाकर सानप यांच्या तर्फे कायम राबवले जात असतात. आणि अशा प्रकारचे उपक्रम आम्ही यापुढेही राबवत राहू असे आश्वासन सचिन सानप यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन सचिन दादा सानप युवा मंच, अजिंक्य भोर उपविभाग प्रमुख, सोनू मुंडे, निखिल वाघमारे, मोहन मांडोळे, राहुल ढवळे, हर्षल सानप, प्रमोद जाधव, शुभम वाघचौरे, राकेश सानप व प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी कट्टर शिवसैनिक यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group