भोसरी (Pclive7.com):- मोरेवस्ती भागातील काही सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असता पांडाभाऊ साने जनसंपर्क कार्यालयास यासंबंधी कॉल आला होता. खूप वेळ होऊन देखील टँकरचे ड्रायव्हर काही कारणास्तव उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना मदत करता आली नाही. ही गोष्ट रुपालीताई साने यांना समजतात त्यांनी स्वतः पाण्याचा टँकर चालून संबंधित सोसायटीच्या नागरिकांना पाण्याची सोय करून दिली.

महिला हि आज कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. अस कोणतेही क्षेत्र नाही की, महिलांनी आपला कर्तृत्वाचा ठसा उमठविला नाही. महिलांनी मनात आणले तर त्यांच्यासाठी कोणतेच काम अशक्य नाही. याचे उत्तम व आदर्श उदाहरण चिखली येथील मोरे वस्ती परिसरात रुपालीताई साने यांच्या रूपाने पहायला मिळाले.
गेली काही महिन्यांपासून मोरे वस्ती परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पांडाभाऊ साने यांच्या माध्यमातून मोफत पाण्याचे ‘टँकर’ सुरु केले आहे. नेहमीप्रमाणेच संपर्क कार्यालयात पाण्यासाठी फोन आला होता. बराच वेळ झाला, परंतु ‘टँकर’चा चालक उपलब्ध नसल्याने स्वतः रुपालीताई साने यांनी ‘टँकर’ चालवत तेथील नागरिकांची पाण्याची समस्या तातडीने सोडविली.

‘टँकर’ चालवत असतांना पाहून प्रत्येकजण मोठ्या कुतुहलाने साने यांच्याकडे पाहत त्यांच्या कार्याचे कौतुक करत होता. साने यांचे हे कार्य निश्चितच आदर्शवत असून त्यातून इतर महिलांना प्रेरणा नक्कीच मिळेल.
मी लग्नाच्या आधी ट्रॅक्टर चालविला आहे. सध्या चारचाकी गाड्या चालविते. फोन आला त्यावेळी एकही चालक उपस्थित नव्हता. त्यामुळे मी स्वतः पाण्याचा टँकर चालवत घेऊन गेले. महिला सक्षमीकरणाचे धडे गिरवण्यापेक्षा स्वतः सारथी बनून मी पाणी पोहोच केले.– रुपालीताई साने





















Join Our Whatsapp Group