शिरूर (Pclive7.com):- शिरूर न्यायलायाच्या आवरात एका व्यक्तीने आपल्या सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये पत्नी मरण पावली असुन आरोपीच्या सासूवर उपचार सुरू आहेत.

माजी सैनिक असणाऱ्या या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यु झाला असून सासू गंभीर जखमी झाली आहे. सासूला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार केल्यानंतर आरोपी जावई फरार झालाय. आरोपीने हा हल्ला का केला यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
न्यायालय परिसरामध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शिरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने पुढील तपास करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group