मुंबई (Pclive7.com):- मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (12th Student) आताची मोठी बातमी आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजे 8 जून रोजी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
त्यानंतर निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व विभागांतील दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल येत्या काही दिवसात जाहीर होतील अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचं नाव टाकणं आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.
























Join Our Whatsapp Group