आळंदी (Pclive7.com):- आळंदी येथील एका लॉजमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२७) रात्री योगीराज चौकातील योगीराज लॉजवर करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार उदयकुमार भोसले यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर प्रताप इंगळे (४२, चिखली, पुणे) याला अटक केली आहे. आरोपी लॉजचा मॅनेजर असून, तो एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर तो स्वतःची उपजीविका भागवत होता. पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. तसेच, लॉज मॅनेजरला अटक केली आहे.























Join Our Whatsapp Group