पिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहू, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा व श्री क्षेत्र आळंदी संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा आषाढी वारी मार्गावर पंढरपूर पायी वारीमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवा करण्यासाठी आरोग्य सेवा पथक, रुग्णवाहिका व औषधोपचार साहित्य उद्घाटन सोहळा गुरुवार दि.२३ जून २०२२ रोजी आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे व हभप नारायण महाराज आळंदीकर यांच्या शुभ हस्ते रुग्णवाहिका व आरोग्य साहित्याला पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आले.
सामजिक कार्यकर्ते अमित गोरखे, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड मेडिकल असोसिएशन सदस्य मधुकर बच्चे, चार्टर्ड अकाऊंटंट राहुल कुलकर्णी, एमक्युएर औषध कंपनीचे संचालक गिरीश घनवट यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषद, चिंचवड जिल्हा कार्यालय येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून आषाढी वारीच्या चारही मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. या आरोग्य सेवा पथकांबरोबर १० अँब्युलन्सेस, जवळपास ३० तज्ञ डॉक्टर्स, ३० नर्सेस, २५ सेवाभावी कार्यकर्ते अथक सेवा देत असतात. दरवर्षी लाखो वारकरी आपल्या सेवेचा लाभ घेतात. यामध्ये वारकऱ्यांच्या सर्व आजारांवर चिकित्सा व औषधोपचर केले जातात.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी विहिंप प्रांत संत संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, प्रांत सेवा विभाग प्रमुख तुषार कुलकर्णी, प्रांत निधी प्रमुख धनाजी मामा शिंदे, पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल विभाग सह संयोजक कुणाल साठे, चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार सर तसेच विहींप, बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आषाढी वारी मुळशी दिंडीचे वारकरी उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन चिंचवड जिल्हा मंत्री धनंजयजी गावडे यांनी केले.