पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरापालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रह अभियान राबविण्यात येत असुन क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणा-या व प्लास्टिकचा वापर करणा-या नागरिक व आस्थापना यांचे प्रबोधन करणेत येत असून त्याचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई करुन सुमारे ४ हजार १०० रूपये दंड वसुल करण्यात आला.

सहा.आयुक्त तथा क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चिखली मोई फाटा परिसर व इंद्रायणीनगर भोसरी परिसरातील ९ नागरिकांवर आज हि कारवाई केली. सदर कारवाईमध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक शांताराम माने, आरोग्य निरिक्षक लक्ष्मण साळवे, वैभव केंचनगौडार सहभागी होते.
रस्त्यावर घाण करणा-या, कचरा रस्त्यावर टाकणा-या नागरिकांवर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करणेत येते. सहा. आयुक्त अण्णा बोदडे यांनी नागरिकांना उघडायवर कचरा टाकु नये, प्लास्टिकचा वापर करु नये आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.





















Join Our Whatsapp Group