पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीच्या विकासाचे शिल्पकार, युवकांचे प्रेरणास्थान दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दि.३१ जुलै रोजी राष्ट्रवादी चषक भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी दिली.

आकुर्डी येथील हॉटेल सिल्वर सेवन, बजाज ऑटो समोर येथे रविवार दि.३१ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत राष्ट्रवादी चषक भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन केले आहे. झाकिर रमजान शेख व जावेद शेख मित्र परिवार यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, फाउंडेशन, सेवाभावी संस्था, गृह निर्माण सोसायट्या यांच्यासह सर्व व्यक्तिगत युवक-युवती यांना सहभाग घेता येईल. तरी सहभागी संस्थानी त्वरित नाव नोंदणी फोनद्वारे करावी.
# विशेष टिप : ज्या सार्वजनिक संस्थाचे जास्तीत जास्त रक्तदाते सहभागी होतील त्या संस्थेला ‘राष्ट्रवादी चषकासह रोख पारितोषिक दिले जातील.
# प्रथम पारितोषिक २१,००० रुपये
द्वितीय पारितोषिक १५,००० रुपये
तृतीय पारितोषिक ७,००० रुपये
उत्तेजनार्थ तीन पारितोषिक
प्रत्येकी ५००० रुपये
# प्रत्येक रक्तदात्याला ‘ब्लू टूथ’ हेडफोन देण्यात येईल.
# पारितोषिक वितरण रक्तदान शिबीर संपल्यावर सायंकाळी साडे पाच वाजता.
# अधिक माहिती साठी संपर्क
प्रकाश परदेशी 9272189242 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags: आकुर्डीजावेद शेखदिवंगत नगरसेवकद्वितीय पुण्यस्मरणपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसभव्य रक्तदान स्पर्धा





















Join Our Whatsapp Group