पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुपीनगर-तळवडे प्रभाग क्र.१ मधील तब्बल ५ हजार नागरिकांना मोफत विमा संरक्षण देण्यात आले. धनंजय भालेकर युवा मंचच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवातीला दहा नागरिकांना मोफत अडीच लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षणाचे पत्र देण्यात आले. यात परमेश्वर तुपे, वनदेव खामकर, सुभाष वायकर, गोकुळ तुपे, महादेव भिलारे, अण्णासाहेब खामकर, किसन फुलसुंदर, सुरेश थोरात, भीमराव वायकर यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरूण थोपटे यांनी केले. तर या कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजनेचे संचालक नाना मालुसरे, भरत कामठे, जमीर मुल्ला, तेजस मालुसरे, अंकुश भालेकर, शंकरराव भालेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी तथा प्रभागातील नागरिक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.






















Join Our Whatsapp Group