पिंपरी (Pclive7.com):- जागा विक्रीबाबतची बोलणी करून कुलमुखत्यारपत्र तयार करून जागा विक्रीचे अधिकार असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखविले. त्यानंतर ९० लाख रुपये स्वीकारले तसेच त्याच जागेचे इतरांसोबत करारनामे केले. त्यातून बांधकाम व्यावसायिक व त्याच्या भागीदारांची फसवणूक केली. हा प्रकार २०१९ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीत भोसरी आणि रास्ता पेठ (पुणे) येथे घडला.

संजय जनार्दन लांडगे (वय ५४, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि.३०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वृंदा बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रोप्रा. जयवंत नारायण अतकरे (रा. बावधन खुर्द, ता. मुळशी), युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्ट असोसिएशनचे सचिव स्टीफन सिंह (रा. उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्टच्या ताब्यातील रास्ता पेठ, पुणे येथील मिळकत विक्री करायची असल्याचे सांगितले. त्याबाबत आरोपींनी फिर्यादी आणि भागीदार रणजित नरसिंहराव पिसाळ देशमुख, सागर आल्हाट यांच्याशी वेळोवेळी बोलणी केली.
त्याच जागेचे करारनामे भीमराव दौलतराव माळवे, अजित प्रभाकर कानडे, नयन शहा, पंकज शहा यांच्याशी करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.३०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.






















Join Our Whatsapp Group