पिंपरी (Pclive7.com):- माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना शहरात सध्या घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना चिंचवडमध्ये घडली. लिंक रोडवरील माणिक कॉलनी येथील पाळीव व भटक्या श्वांनाना काही समाजकंटकांनी खाद्यपदार्थाद्वारे विषारी औषध देऊन हत्या करण्याचा प्रकार गेले दोन-तीन दिवस घडत आहे.

शुक्रवारी व्यायलेल्या एका कुत्रीला कोणीतरी विषारी औषध दिले. दरम्यान, दूध पिल्यामुळे पिल्लांचा जीव गेला, यानंतर तिचाही मृत्यू झाला. नागरिकांचा समज झाला गॅस्ट्रो साथीमुळे तोंडातून त्यांचा फेस येऊन मृत्यू झाला.
परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा येथीलच परंतु, ‘मोती’ नावाच्या कुत्र्याबाबतही असाच प्रकार केला. तो वेदनेने ओरडू लागल्यामुळे तेथील प्राणी प्रेमी नवीन हेगडे, प्रसाद भूमकर, नकुल भोईर, तुषार आढारी सहकारी मित्रांनी मोतीला दवाखान्यात नेले.
डॉ. गोरे यांनी तपासल्यावर सांगितले, त्याला कोणीतरी विष दिल्यामुळे त्याचा त्रास त्याला होत आहे. जीभ पूर्ण काळी निळी झाली होती. उपचार करून त्याला नेहरूनगर येथील हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यास सांगितले. परंतु काल सकाळी मोतीचा मृत्यू झाला. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा दाखल करणार आहोत. शिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी डॉक्टरांच्या महत्त्वाच्या कामा चिठ्ठीशिवाय औषध विक्री दुकानदारांनी हे औषध देऊ नये, अशी विनंती करणार असल्याचे प्राणिमित्र भोईर यांनी सांगितले.
श्वांनाना विषबाधा करणे हा एकप्रकारचा गुन्हा आहे. अशा विकृतींवर कारवाई केली पाहीजे. नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल.– सचिन ढोले, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग






















Join Our Whatsapp Group