पिंपरी (Pclive7.com):- सनसागर मित्र मंडळातर्फे भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव तसेच सनसागर मित्र मंडळाचे 21 वर्षे पूर्ण झाल्याने मंडळाच्या 75 आजी-माजी ज्येष्ठ सभासद यांना शाल श्रीफळ तिरंगा व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला सौ. सुलभाताई उबाळे, यशवंत भाऊ कन्हेरे, सुनील गाडे शशिकला उभे, अविनाश भाऊ देवकर, फिरोज शेख, सुभाषशेठ मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुलभाताई उबाळे यांनी सनसागर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले व मंडळाने मागील वर्षांमध्ये केलेल्या कामांचे विविध उपक्रमांचे कौतुक केले. गेले दोन वर्षांमध्ये ल करोना काळामध्ये मंडळाने जे काम केले त्याबद्दल शाब्बासकीची थाप दिली.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सचिन दादा सानप (शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड शहर) व मंडळाचे सदस्य राहुल ढवळे, प्रणील धुमाळ, जयेश तांबोळी, सागर टिके, सुशांत राव शेखर रुपवते, योगेश रुपवते प्रमोद कांबळे, शुभम कांबळे, सचिन तळेकर, हेरंब देवकर, अक्षय भापकर, साहिल किरण सानप, हर्षल सानप, दीपक सानप, सोनू मुंडे, प्रशांत धुमाळ, शुभम वाघ, कृष्णा बिरादार, अमोल गायकवाड, राकेश सानप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
Tags: ७५ आजी माजी जेष्ठ सभासदांचा सन्मानशिवसेनासचिन सानपसचिन सानप युवा मंचसनसागर मित्र मंडळसंभाजीनगर





















Join Our Whatsapp Group