पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील विद्यादीप शिक्षण संस्था संचालित विद्यादीप प्राथमिक विद्यालय, विद्यादीप माध्यमिक विद्यालय व माने इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते.

शाळेत विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांनी काळेवाडी प्रभागात जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांची वेशभूषा परिधान केले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रभागात फेरी काढण्यात आली.






















Join Our Whatsapp Group