पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित असलेल्या श्री गजानन लोकसेवा बँकेच्या अध्यक्षपदी श्रीमती अनुराधा गोरखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष स्व.मधुकर बाबर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक, चिंचवड या बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या जेष्ठ संचालिका माजी नगरसेवक श्रीमती.अनुराधा गोरखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. श्रीमती.गोरखे या गेली बावीस वर्षे राजकीय व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून त्या बँकेच्या संचालिका आहेत. नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे अध्यासी अधिकारी श्री.नवनाथ अनपट (भोसले), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांच्या अध्यक्षते खाली दिनांक ०१/०९/२०२२ रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती अनुराधा गोरखे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू असे मनोगत व्यक्त केले. सदर निवडणूक प्रक्रियेवेळी उपाध्यक्ष श्री.रमेश वाणी, संचालक श्री.दिलीप देशमुख, श्री.शंकर वाडकर, श्री.आनंदराव निकम, श्री.अशोक काळभोर, श्री.अतुल इनामदार, श्री.धर्मेंद्र थारेवाल, सौ.वंदना भांगडिया, सौ.वत्सला जाधव, अॅड. अमित चौकडे, अॅड. अभयकुमार आपटे हजर होते.
Tags: अध्यक्षअध्यक्ष पदअनुराधा गोरखेअमित गोरखेचिंचवडबिनविरोध निवडमाजी नगरसेविकाश्री गजानन लोकसेवा सहकारी बँक






















Join Our Whatsapp Group