पिंपरी (Pclive7.com):- मद्यपान केलेला व्यक्ती साडीने पाचव्या मजल्यावरून खाली उतरत असताना त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना निगडी ओटास्कीम येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल सुदाम कांबळे (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले अनिल सुदाम कांबळे हे दररोज मद्यपान करत होते. ते आणि त्यांची पत्नी निगडी ओटा स्कीम येथील प्रेरणा सोसायटी येथे पाचव्या मजल्यावर राहतात आहेत. काल बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता दारूच्या नशेत अनिल कांबळे यांनी घराच्या खिडकीतुन साडीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हाथ निसटल्याने ते थेट खाली कोसळले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
असंवेदनशील बाब म्हणजे बघ्यांनी या सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. अनिल यांना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags: दारूच्या नशेतील स्टंटबाजी जीवावर बेतलीनिगडीनिगडी पोलिसपाचव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यूस्टंटबाजी






















Join Our Whatsapp Group