पुणे (Pclive7.com):- वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. बिबवेवाडी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्वाती देसाई यांनी पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेतील आर्थिक विभागात काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात बदली झाली होती.

स्वाती देसाई यांनी जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात सेवा केली. त्यांनी काही काळ सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते. पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत काही काळ काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती.
सहकानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक जटील गुन्ह्यांचा तपास लावला. प्रेयसीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्याला तातडीने पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले होते. पीएमपी बसमध्ये चोर्या करणार्या चोरट्यांची टोळी त्यांनी पकडली होती. लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते.






















Join Our Whatsapp Group