पिंपरी (Pclive7.com):- रुपीनगर येथील एकता चौकात पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अमर हुतात्मा स्मरण गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. या विसर्जन कुंडाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभागातील माजी नगरसेविका पौर्णिमाताई रवींद्र सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आप्पा सोनवणे आणि मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने रुपीनगर तळवडेतील गणेश भक्तांसाठी या गणेश विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे.
देशासाठी वीर जवानांनी बलिदान दिले, त्या सर्वांप्रती नवीन पिढीला कृतज्ञता राहावी, आणि प्रेरणा मिळावी, यासाठी “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अमर हुतात्मा स्मरण गणेश विसर्जन कुंड” हे समर्पक नाव देण्यात आले आहे. या गणेश विसर्जन कुंडात परिसरातील सर्व गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती विधिवत विसर्जित करून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आप्पा सोनवणे आणि मित्र परिवाराने केले आहे.
गणेश विसर्जन कुंडा शेजारीच निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार, शरद भालेकर, सुधाकर दळवी, बाप्पा जाधव, प्रदीप गोरे, राजू नातू, महेंद्र शिंदे, माऊली दवणे, प्रवीण पगारे, राजू खटावकर, गजानन काळे, स्वप्निल काळे, सचिन ढोबळे सर, प्राचार्य सुबोध गलांडे, रोहितदास शिंदे, जयप्रकाश बोऱ्हाटे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय देवळे यांनी केले, तर आभार प्रदीप गोरे यांनी मानले.