पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवीतील समतानगर मध्यील ३६ वर्षीय रोहित भोर या तरुणाचा औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये डेंग्यी आजाराने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तो बारा दिवस मृत्यूशी झुंज देत होता, अत्यंत प्रेमळ, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला प्रेमळ रोहित सर्वांच्या मनाला वेदना देऊन गेला आहे. त्याचे वडील चिमणराव भोर यांचाही गेल्या वर्षी कोरानामुळे मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या कोरोना कमी झाला अन न्युमोनिया आणि डेंगी आजारांने नागरिक धास्तावलेले आहेत. रोहितचे डेंगिमुळे निधन हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले असल्याचा आरोप होत आहे. रोहितचा लहान भाऊ विनीत भोर म्हणाला की, समतानगर गल्ली नंबर दोनच्या पाठीमागे ढोरे फार्म हाऊसच्या जवळच एका खाजगी बांधकाम व्यवसायिकाने बांधकाम चालू केले आहे. त्या खाजगी जागेत पाण्याची फार मोठी डबके तयार झाले आहेत. त्यामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशा साठलेल्या पाण्यातच डासाची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास सी.एम.ई. कॉलनीतील व समतानगर मधील नागरिकांना होत आहे. याचा महापालिकेने गांभीर्याने विचार करावा आणि अजून कोणालाही त्रास होणार नाही व मृत्यूला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा विनीत भोर यांनी व्यक्त केली.
या घटनेबाबत मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात फवारणी करून साठलेल्या डबक्यातील पाणी काढण्यासाठी खाजगी व्यवसायिकाला नोटीस पाठवून परिसर स्वच्छ ठेवण्याची ताकीद द्यावी. डेंगी आजाराची जनजागृती आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन, व गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने करावी असे अण्णा जोगदंड यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group