पुणे (Pclive7.com):- एकम वर्ल्ड पीस फेस्टिव्हलचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. पंडित भीमसेन जोशी सभागृह औंध येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ. विठ्ठलराव जाधव (माजी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य), धिरज घाटे (मा.नगरसेवक), दत्ता बोडके, डॉ. सुनील देव, वसंत पाटील (खानदेश मित्र मंडळ), नरेंद्र कोहिनकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी एकमचे आध्यात्मिक गुरु कृष्णाजी व प्रीताजी यांनी दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. सर्वाना शांती किंवा कोणालाच शांती नाही. सर्वांनी प्रथम आपल्या मनात प्रेम व शांती ठेवावी असे प्रतिपादन केले. अन्य मान्यवरांनी बोलतांना सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव निर्माण होतात, व त्यातून शारीरिक व मानसिक प्रश्न निर्माण होतात. यासाठी सामूहिक ध्यान हा महत्वाचा उपाय आहे असे प्रतिपादन केले. डॉ. निधी देव यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
Tags: आध्यात्मिक गुरुउद्घाटन संपन्नएकमएकम वर्ल्ड पीस फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्नकृष्णाजीखानदेश मित्र मंडळडॉ. विठ्ठलराव जाधवडॉ. सुनील देवदत्ता बोडकेधिरज घाटेनरेंद्र कोहिनकरप्रीताजीमाजी नगरसेवकमाजी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्यवसंत पाटील





















Join Our Whatsapp Group