पिंपरी (Pclive7.com):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे टपाल दिनानिमित्त पोस्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोसरी पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर पंढरीनाथ चव्हाण व पोस्ट कर्मचारी दिलीप जाधव, म.ला.रासकर, मुकेश अवाड, मिलींद गरड, नितीन वाडवे, सचिन बुरुड, शंकर यनसनवार, संदिप परातेके, अशोक वाघमारे, साईनाथ यनगंडीवार, सौ.मिना माळवे ,कु.रसिका भांड, योगिता पाडाळे, कस्तुर सिरसाठ इ.चा सत्कार नक्षञाचं देणं काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे व आळंदी विभागप्रमुख कवी रामदास हिंगे यांच्या शुभहस्ते पुस्तक व गुलाबपुष्प भेट देऊन करण्यात आला.

यावेळी प्रा.राजेंद्र सोनवणे म्हणाले, “नक्षञाचं देणं काव्यमंच तर्फे गेली २० वर्षांपासुन टपाल दिनानिमित्त कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात येत आहे. पोस्ट कर्मचारी हे प्रामाणिक सेवा देत आहेत. राष्ट्रीय कामात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कामाच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठीच हा सत्कार केला जातो. काव्यमंचच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत. त्या शाखेतर्फे ही विभागानुसार पोस्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार केला जातो. सामाजिक भान ठेवून कार्य करणा-या समाज घटकांचा विविध माध्यमातुन सन्मान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
यावर्षी जळगाव जिल्हा अध्यक्षा कविवर्या सौ.पुष्पलता कोळी, कवी निवृत्तीनाथ कोळी, गोंदिया जिल्हाअध्यक्षा कविवर्या सौ.किरणताई मोरे, यवतमाळ जिल्हाअध्यक्षा कविवर्या मंदाताई वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष कविवर्य उदय सर्पे, नाशिक जिल्हाअध्यक्षा सौ.माधुरी बागुल, सातारा जिल्हाअध्यक्षण कविवर्य सुनिल जाधव, पालघर जिल्हाअध्यक्षा कविवर्या सौ.रजनी ताजणे, रायगड जिल्हाअध्यक्ष कविवर्य संजीव शेरमकर, रत्नागिरी जिल्हाअध्यक्षा कविवर्या सौ.वृषाली टाकळे, नागपुर जिल्हाअध्यक्षा कविवर्या नगराध्यक्षा सौ.शोभाताई कऊटकर, लातूर जिल्हाअध्यक्ष कविवर्य इंजि.मैलारीराज कावळे, सोलापुर जिल्हाअध्यक्ष कविवर्य सुनिल बिराजदार, तसेच मालवण मधुन कविवर्य मंदार सांबारी, सातारा शहर मधुन रामचंद्र पंडित, मुरुड जंजिरा मधून सौ.नैनिता कर्णिक, जुन्नर मधुन कविवर्य यशवंत घोडे, कविवर्य ज्ञानेश्वर काजळे, आळे मधुन कविवर्य पियुष काळे, कुडाळ मधुन प्रा.नरेंद्रकुमार चव्हाण, पुसद कविवर्य रामदास घुगंटकर, गडचिरोली कविवर्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपुर यवनाश्व गेडकर, ज्योती चन्ने, प्रा.नरेंद्र पोतदार, छाया ब्रम्हवंशी, दत्ता भगत आदींनी अनेक विभागातुन कव्यमंच तर्फे पोस्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. हि राष्ट्रीय जबाबदारी काव्यमंच तर्फे पार पाडल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group