पिंपरी (Pclive7.com):- चिखली-प्राधिकरण येथील ओयासिस गॅलेक्सी हाउसिंग सोसायटीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.

चिखली-प्राधिकरण सेक्टर.१३,प्लॉट नं.१०५ स्पाईन रोड येथील ओयासिस गॅलेक्सी हाउसिंग सोसायटीत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी महापौर राहुलदादा जाधव, युवा नेते योगेशभाऊ लांडगे, शिवराज लांडगे, गणेशभाऊ गवळी हे उपस्थित होते.
या शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराकरिता मोरया ब्लड बँक चिंचवड यांनी सहकार्य केले. ओयासिस गॅलेक्सी हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष कुंदन काळे, खजिनदार सचिन लोढा, सेक्रेटरी बालाजी चालवा यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.



















Join Our Whatsapp Group