पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर शिवसेना व पिंपरी विधानसभा युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सव २०२२ ची अतिशय आनंदाच्या वातावरणात सांगता झाली. पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी बाल मेळावा, दुसऱ्या दिवशी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची लोकधारा, चौथ्या दिवशी केला इशारा, पाचव्या दिवशी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे व माजी मंत्री विजय बापू शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित कार्यक्रमांमध्ये लहान चिमुकल्यांसह, महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.
त्यातच खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमास दापोडी फुगेवाडी सह असंख्य महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यामध्ये दापोडी येथील सौ.हुसेनबी शेख यांनी प्रथम क्रमांक मिळवत एलईडी टीव्ही व मानाची पैठणी पटकावली. द्वितीय क्रमांक सौ.पूनम भांडे या विजयी ठरल्या. त्यांना वॉशिंग मशीन व मानाची पैठणी मिळाली. तृतीय क्रमांकच्या मानकरी ठरलेल्या सौ.नलिनी साळवे, यांना मायक्रो ओवन देण्यात आले. तर काही महिलांची लकी ड्रॉ द्वारे निवड करत त्यांनाही विविध प्रकारची प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली. विशेषतः महिलांसाठी केलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे महिला वर्गांनी निलेश हाके यांचे मनःपूर्वक आभार मानले. चुल आणि मुल यानंतर महिलांना एक विशेष असे व्यासपीठ दिल्याबद्दल सर्व महिलांनी मनमुराद आनंद घेतला.
यापुढेही असे समाज उपयोगी सामाजिक सांस्कृतिक एकोपा कायम राहावा या दृष्टीने कार्यक्रम घेत अजून मोठ्या प्रमाणात त कसा कार्यक्रम घेता येईल याचा पाठपुरावा करून यापेक्षाही चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू असं मत पिंपरी युवा सेना युवा अधिकारी यांनी व्यक्त केले.
ह्यावेळेस माजी मंत्री व शिवसेना उपनेते विजय बापु शिवतारे, मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे, बशीर भाई सुतार, सरिता साने, राजेश वाबळे, माऊली जगताप, शैला निकम, शैला पाचपुते, मनाली कुटे, संगीता गायकवाड, उषा साठे, उषा मगर, गंगा पोळके, राधा संगीत, अपर्णा कोष्टी, रुपाली जाधव, संगीता वाखारे, सुनीता घरबूडवे, कविता साठे, मनीषा पाटोळे तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रीकांत शेवाळे, राजू खलसे, अविनाश जाधव,विशाल घरबूडवे,चिंचपा निन्गडॊळे, मनोज काची उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group