पिंपरी (Pclive7.com):- दरमहिना सात हजार रुपये हप्ता द्या, नाही तर तुला दवाखाना चालवू देणार नाही, अशी धमकी डॉक्टरला देणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुरुषोत्तम क्लिनिक, शास्त्री चौक, आळंदीरोड येथे बुधवारी (दि.५) सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी पुरुषोत्तम कारभारी राणे (वय ४२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यानुसार, पोलिसांनी सुदर्शन ऊर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय २५), गोविंदा कोळी (वय २४), सचिन सारसे ऊर्फ काळा सच्या (वय २३, रा. आनंदनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे क्लिनिकमध्ये असताना आरोपी सुदर्शन याने दर महिना सात हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. तसेच, हप्ता न दिल्यास या परिसरात येऊ देणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच क्लिनिकमधून बाहेर येऊन मेडिकलमधून औषधे घेतली. मेडिकल मालक रोहिदास घेनंद यांनी पैशाची मागणी केली असता, ऐ माकडा कसले पैसे मागतो, मी कधी कोणाला पैसे देतो का, तुला माहिती नाही का, असे म्हणत आरोपी निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.






















Join Our Whatsapp Group