चला यंदा दिवाळीतला प्रत्येक क्षण सुवर्णमय बनवूया, यंदाची दिवाळी लख्ख करूया..!
पिंपरी (Pclive7.com):- आपण सर्वजण धनत्रयोदशी ते भाऊबीज हे दिवाळीचे ४ ते ५ दिवस उत्साहात साजरे करतो. दिवाळीच्या खरेदीचा विचार केला, तर आपल्या डोळ्यांसमोर एक शुभ मुहूर्त येतो. तो म्हणजे धनत्रयोदशीचा. दिवाळीच्या ५ दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान कुबेरासोबत धन्वंतरीची पूजा केली जाते. आपणा सर्वांना माहिती आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

आज… मंगळवार, दि. १८ ऑक्टोबर खरेदीसाठी उत्तम मुहूर्त आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र आहे आणि हे मंगळवारच्या दिवशी असल्यामुळे मंगल पुष्य नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशीची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. ती खरेदी करा सत्यम ज्वेलर्सच्या साक्षीने!
खरंच, आपण सर्वजण दिवाळीची वाट अगदी आतुरतेने बघत असताना… कधी दिवाळी आपल्या उंबऱ्याशी लक्ष दिव्यांचा प्रकाश घेऊन आली कळलंच नाही. घराची साफसफाई, फराळाची लगबग, सगळ्यांच्या आवडीची खरेदी, घरी फराळासाठी पाहुण्यांचं होणारं आगमन, मित्र-मैत्रिणींच्या होणाऱ्या भेटी आणि गप्पा ह्या सगळ्या गोष्टींची लगबग चालू झाली आहे.

सत्यम ज्वेलर्स दागिन्यांच्या उत्कृष्ट डिझाईन्स आणि त्यातील विविधतेसाठी गेली ३५ वर्षे अविरतपणे ग्राहकांच्या सेवेत सादर आहेत. ग्राहकही सत्यम ज्वेलर्सकडे फक्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत तर आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत सत्यम ज्वेलर्सला आपला सोबती मानतात. आणि ही पेढी ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. सत्यम ज्वेलर्सकडे पिढ्या-पिढयांचा ग्राहकवर्ग आहे. ७० वर्षांच्या आजी-आजोबापासून २५ वर्षांच्या तरुणापर्यंत सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचं श्रेय जाते ते ‘टीम सत्यम‘ला.

कोरोनाच्या महासंकट नंतर यंदाच्या दिवाळीत सत्यम ज्वेलर्स ग्राहकांचा सोने खरेदी उत्साह लक्षात घेता, सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर भरघोस सूट देत आहे. “सोने दागिने मजुरी रु. ३४५ प्रतिग्रॅम पासून सुरु” अशी विशेष सूट सत्यम ज्वेलर्सच्या – निगडी, कृष्णानगर आणि चाकण इथल्या शाखांमध्ये उपलब्ध आहे.

तर मग वाट कशाची बघताय? चला यंदा दिवाळीतला प्रत्येक क्षण सुवर्णमय बनवूया…यंदाची दिवाळी लख्ख करूया! ही दिपावली आपल्या सर्वांसाठी समृद्ध, उत्साहवर्धक आणि आरोग्यदायी जावो, हीच टीम-सत्यम ज्वेलर्सकडून आपणा सर्वांना सदिच्छा!






















Join Our Whatsapp Group