
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले “पुणे पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील लाखो लोक व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. दिवाळी सणानिमित्त हे सर्व लोक एसटी बस ने आपापल्या गावी जातात. एकीकडे महागाईने जनता होरपळून गेली आहे. त्यातच सरकारने एसटी बसचे तिकीट दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं आहे. एक तर प्रचंड महागाई या भाजप सरकारने देशावर व राज्य वर लादली असून त्याचा सामना या देशातील नागरिक कसाबसा करीत आहे. प्रत्येक वस्तू दर गगनाला भिडले आहेत मग ते सुईपासून भाज्या पासून तेल पर्यंत भाववाढ या भाजप सरकारने केली असून महागाईचा सामना करण्याची वेळ सणासुदीला सामान्य नागरिकांवर आली आहे. एसटी तिकीट दरवाढ मागे घेतली नाही तर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेण्यात येईल याचा इशारा यावेळेस अजित गव्हाणे यांनी दिलाय.
महिला अध्यक्ष कविता आल्हाट म्हणाल्या “गोरगरिबांना आधीच कमी पगार असतो त्यात दिवाळीच्या समोर एसटी बस तिकीट दरवाढमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, संगीता कोकणे, मीरा कदम, समिता गोरे, उज्वला शिंदे, युवक विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, उपाध्यक्ष रोहित वाबळे, अमोल रावळकर, दिनेश पटेल, मंगेश बजबळकर, युवक सरचिटणीस दीपक गुप्ता, स्वप्निल गायकवाड, सागर वाघमारे, युवा नेते राहुल पवार, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला, ओम शिरसागर अनुज देशमुख, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, मयूर खरात, तुषार ताम्हणे, कामगार नेते युवराज पवार, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group