पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी बाजारपेठेत दिवाळी सणामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने पिंपरी बाजारपेठेतून अवजड वाहने व सिटी बसचा मार्ग वळवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत वाहतूक विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार ही वाहतूक मंगळवारी (दि.१८) दुपारी एक वाजल्यापासून ते बुधवार (दि.२६) रात्री १२ वाजेपर्यंत वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद केलेले वाहतूक मार्ग व त्याला पर्यायी मार्ग
● जयहिंद हायस्कूल डिलक्स चौक कराची चौक रिव्हर रोड- भाटनगर चौक पिंपरी पूल- मोरवाडी चौक मुंबई-पुणे जुना हायवे हा मार्ग अवजड वाहने व सिटी बस यांच्याकरिता वाहतुकीस बंद करण्यात येत आहे.
● पर्यायी मार्ग जयहिंद हायस्कूल डिलक्स चौक काळेवाडी-एमएम शाळेकडून उजवीकडे वळून एम्पायर इस्टेट मदर टेरेसा पूल अँटी क्लस्टर मार्गे मोरवाडी चौक मुंबई पुणे जुना हायवेवरून पुढे पिंपरी चौक गोकुळ हॉटेल-पिंपरी पूल शगुन चौक-कराची चौक
● डीलक्स चौक जय हिंद हायस्कूल पिंपरी गाव हा मार्ग अवजड वाहने व सिटी बस यांच्याकरिता वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग पिंपरी चौक मोरवाडी चौक एम्पायर इस्टेट मदर तेरेसा फ्लायओव्हर एमएम चौकाकडून डावीकडे वळून काळेवाडी डिलक्स चौक जयहिंद हायस्कूलमार्गे पुढे.





















Join Our Whatsapp Group