पिंपरी (Pclive7.com):- पीएमआरडीएच्या प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज भरण्याची मुदत ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत इडब्लूएस गटाकरिता (अनुसूचित जमाती (ST) करिता २९ सदनिका व विमुक्त जाती (DT) करिता २ सदनिका) ३१ सदनिका व LIG प्रवर्गातील ७९३ सदनिका व पेठ क्र. ३०-३२ येथील इडब्लूएस (1RK ) प्रवर्गातील ३६६ सदनिका व LIG (1BHK) प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा सर्व सुविधांनीयुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात येत आहे.
प्रकल्पातील घरे डिसेंबर २०२२ पूर्वी ताबा देणेचे नियोजीत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्याची मुदत १८ ऑक्टोबर २०२२ रोजी संपुष्टात येणार होती. ही मुदत ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार, २ नोव्हेंबरअखेर नोंदणी करून नागरिक ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता www.pmrda.gov.in व http:// lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. वाढीव मुदतीच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.