पिंपरी (Pclive7.com):- पुणे वृत्तपत्र विभागाच्या निगडी विभागाकडून स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी सर्व वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते. संघाच्या निगडी विभागातर्फे हॉटेल कृष्णा या ठिकाणी दिवाळी सरंजाम वाटपाचा कार्यक्रम झाला. तसेच, विविध वृत्तपत्रांच्या सेंटर चालकांना कीटवाटप करण्यात आले. वृत्तपत्रांच्या विभाग प्रतिनिधींना मिठाई वाटप केली.

यावेळी निगडी विभागप्रमुख प्रशांत पाटील, विश्वास फापाळे, राजू भालेकर, दिनेश लिंगवत, बी. के. मोरे, नागेश भिंगारे, राजेंद्र भंडारी व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती सदस्यांना देवून त्यांच्या शंकाचे निरसन पारगे यांनी केले.
विभागप्रमुख पाटील म्हणाले, “अशा प्रकारचा कार्यक्रम विभागात सलग दुसऱ्या वर्षी होत आहे. यापुढे विविध उपक्रम घेण्याचा मानस आहे. पदाधिकारी बापू गोरे, प्रदीप सोनजे, गणेश भिंगारे, मनोज मोरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भोईर, हिरालाल पटेल, पंडित एवळे, अविनाश भालेकर, वीरेंद्र परदेशी यांनी सहकार्य केले. विभागप्रमुख फापाळे यांनी आभार मानले.
Tags: DiwaliPrashant Patilनिगडीवृत्तपत्र विक्रेते विभागवृत्तपत्रांच्या सेंटर चालकांना दिवाळीनिमित्त कीट वाटपस्नेहमेळावा संपन्न






















Join Our Whatsapp Group