पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार आहे.
येत्या सात दिवसांत अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tags: Pcmc CommissionerPimpri Chinchwad Municipal CorporationShekhar SinghYcmYcm hospitalYcm Hospital News





















Join Our Whatsapp Group