प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळ अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्यानंतर काही हिंदू संघटना आणि शिवप्रेमींनी आक्षेप घेतला होता. हे बांधकाम हटवण्या यावं यासाठी निवेदनही देण्यात आलं होतं. २००६ पासून हा परिसर सील करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं.
पहाटे ५.३० वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चार जिल्ह्यातील १५०० हून अधिक पोलीस साताऱ्यात दाखल झाले आहेत. तसंत परिसरात १४४ कलम लागू कऱण्यात आलं असून, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई सुरु आहे. माध्यम प्रतिनिधींनाही परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.