पिंपरी (प्रतिनिधी):- प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणीवर चाकूने वार करण्यात आले. ही घटना काल (दि.२२) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेल जवळ घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (वय.३० रा.पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी जखमी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, या तरुणीचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तर बबलूचे तरुणी व तिची मैत्रीण दोघींशी प्रेमसंबंध होते. या दोघीही बबलूला भेटायला पिंपरी येथे आल्या असताना त्या तिघांमध्ये प्रेमसंबंधातून वाद झाले. यावेळी आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून बबलूने तरुणीवर चाकूने गळ्यावर व दातावर वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.






















Join Our Whatsapp Group