पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड येथे एका तरुणाला दगडाने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) रोजी रात्री घडली. बुधवारी (दि. २५) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सुरज चंद्रकांत खांबे (२५, रा. भुवनेश्वर कॉलनी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा चिंचवड येथील दवाबाजारमध्ये नोकरीला होता. त्याची मैत्रीणही त्याच ठिकाणी नोकरीस आहे. या मैत्रीणीचे लग्न अन्य ठिकाणी जमले होते तरी ते दोघे भेटत होते. मंगळवारी (दि. २४) ला रात्री दहा वाजता सुरज खांबे हा मैत्रीणीसोबत बोलत बसला असताना पाठीमागून येऊन त्याला काही अज्ञात व्यक्तींनी दगडाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा बुधवारी मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group