पिंपरी (प्रतिनिधी):- राज्याचे कँबिनेट मंत्री झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आलेले महादेव जानकर यांनी अवघ्या २ मिनिटात पत्रकार परिषद गुंडाळली. जानकर आले आणि पदाधिकार्यांना न भेटताच काही क्षणात परत गेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
महादेव जानकर एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. यातच त्यांच्याच पक्षाच्या पिंपरी चिंचवडच्या पदाधिकार्यांनी शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचा घाईत घेण्याचा निर्णय घेतला. जानकरांनी देखील त्यांना होकारही दिला. मात्र नियोजीत वेळेच्या दीड तास उशिरा जानकर आलेही परंतू कार्यक्रमस्थळी येताच पत्रकरांना पाहून ते गोंधळून गेले. त्यांनी पदाधिकार्यांशी सर्वांसमोरच चिडचिड केली.
त्यांच्या प्रस्तावनेनंतर त्यांनी पत्रकरांना प्रश्न विचारण्यास सांगितले. मात्र, पहिल्याच प्रश्नानंतर त्यांनी अवघ्या २ मिनिटांतच पत्रकार परिषद गुंडाळली. शेतकर्यांचा कर्जमाफीबाबत पत्रकरांच्या प्रश्नांचा रोख लक्षात येताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला. यामुळे ते ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्यालाही त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे हताश झालेल्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group