पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्हा क्रीडा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एस.एम. जोशी महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने मुलांच्या गटात अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेते पद पटकाविले.
मुलांच्या गटात अंतीम सामन्यात निगडीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) संघाने भोसरीतील आरजेएसपीएम संघावर सरळ सेट ३/० गुण मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. वैयक्तिक श्रेणित पीसीसीओईचे खेळाडू दिपांशु नागपाल व रोहन चिंचकर यांनी अनुक्रमे ६ व ७ वे स्थान प्राप्त केले व त्यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या संघात निवड झाली. या स्पर्धेत सांघिक श्रेणीमध्ये पुणे जिल्ह्यातील तीस महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला. विजयी संघातील खेळाडू दिपांशु नागपाल, रोहन चिंचकर, कपिल मोरे, मोहित दळवी, यश पैठणकर, अमेय जोशी व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी अभिनंदन केले.