नवी दिल्ली :- सरदार पटेल जयंतीनिमित्त संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समोरा-समोर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा एक फोटो समोर आलाय. त्यामध्ये दोघंही एकमेकांकडे भेदक नजरेनं पहात असल्याचं दिसतंय.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत असल्यानं प्रचारादरम्यान मोदी आणि राहुल एकमेकांविरोधात तोफ डागत आहेत. त्याची झळ या सभागृहातही पहायला मिळाली.
दरम्यान, या कार्यक्रमाचा आणखी एक फोटो व्हायरल झालाय. ज्यामध्ये लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींशी चर्चा करत आहेत तर नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांसोबत त्यांच्यामागे उभे आहेत.