पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये महाविद्यालयीन तरुणीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना पिंपरी स्टेशनजवळ सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली.
पिंपरी स्टेशनजवळ सकाळी सव्वादहाच्या सुमारास या तरुणीने स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिले. यामुळे या तरुणीचा रेल्वेच्या धडकेने जागेवरच मृत्यू झाला. या तरुणीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून आत्महत्येचे कारणही अद्याप समजू शकले नाही. या घटनेची पोलीसात नोंद झाली असून पोलिस तपास करीत आहेत.