मुंबई (Pclive7.com):- शिवसेना-मनसेचा गड असलेल्या दादरमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे. यावेळी काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
मालाडमध्ये फेरीवाला सन्मान मोर्चा काढल्यानंतर आज संजय निरुपम दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी आंदोलन करण्यासाठी आले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र यावेळी मनसे आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी बटाटे फेकून मारले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
हा मोर्चा काढून एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान केल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली.