पिंपरी (Pclive7.com):- भोसरी पोलिस ठाण्याच्या प्रभारी प्रमुखपदी (वरिष्ठ निरीक्षक) संपतराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्यात नियुक्त असणा-या सहाय्यक निरीक्षकास व शिपाईला ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात होती. तसेच मागील अनेक महिन्यांपासून भोसरीच्या तपास पथकाकडून कोणताही मोठा गुन्हा उघडकीस आणलेला नाही. तसेच चो-या रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे भोसले यांना भोसरीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त केल्याचे समजते. तर कुलकर्णी यांनी वैद्यकीय कारणामुळे स्वत:हून बदली मागून घेतल्याचे सांगितले जात आहे.