पुणे (Pclive7.com):- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उपहासात्मक प्रतिसाद देत खासदार सुप्रिया सुळे यांनी रोडवरच्या खड्ड्यासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसरातील रस्त्यावरच्या खड्ड्यांचे फोटो काढून ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच त्यांनी राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? असा परखड सवाल विचारला आहे. तसेच, खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.