पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही वर्षांपासून पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रस्त्यावरून सुरु असलेली बस सेवा बंद करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांना मुख्य करून जेष्ठ नागरिक व महिलांना स्वारगेट, पुणे स्टेशन, कोथरूड, मनपा आदी ठिकाणी जाण्यासाठी दोन किलोमीटर फिरून जगताप डेअरी येथे जावे लागत होते. जे या परिसरातील नागरिकांसाठी फार त्रासदायक ठरत होते.

सदर बाबची गांभीर्याने दखल घेत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्वारगेट PMPML विभाग पदाधिकारी यांना फेब्रुवारी २०२२ रोजी पत्रव्यवहार करीत सदर बाब निदर्शनास आणून दिली होती. कुणाल आयकॉन परिसरात साधारण तीन ते चार बसथांबा देखील आहेत. परंतु यामार्गे बस सेवा कार्यान्वित नसल्यामुळे ते वापराविना पडून आहेत. याभागात साधारण १५ ते २० हजार नागरवस्ती असून यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, व महिला यांचा समावेश आहे.
शत्रुघ्न काटे यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत PMPML विभागामार्फत कोथरूड ते पिंपळे सौदागर (जगताप डेअरी – शिवार चौक – कुणाल आयकॉन रोड – कुंजीर क्रीडांगण – साई ड्रीम सोसायटी – गोविंद यशदा चौक ते महादेव मंदिर मार्गे) बससेवा सुरु करण्यात आली आहे. आणि यावेळी शत्रुघ्न काटे यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे कि या बससेवेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला पाहिजे जेणेकरून सदर बससेवा नियमितपणे आपल्या सेवेत कार्यान्वित राहील.

























Join Our Whatsapp Group