पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश पुणेकर यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी कालिदास इंगळे यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या ९४४ सभासदांपैकी ७६० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. सुनील कडूसकर, अॅड. प्रमोद कांबळे, अॅड. राजेश पुणेकर यांच्यात लढत झाली. त्यात राजेश पुणेकर ३३३ मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदी अॅड. कालिदास इंगळे हे ६२६ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील जामनानी यांचा १०७ मतांनी पराभव झाला. सचिवपदी अॅड. तुकाराम पडवळे ४०८ मतांनी निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. नरेश शामनानी यांना ३२९ मते पडली. महिला सचिवपदी अॅड. कांता गोर्डे यांचा ४७७ मतांनी विजय झाला. तर प्रतिस्पर्धी मोनिका सचवाणी यांना २७५ मते पडली. सहसचिव प्रदीप ढोले ४८१ मतांनी विजयी तर प्रतिस्पर्धी अंकूश गोयल यांना १९९ मते पडली. खजिनदार पदासाठी हर्षद नढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हिशोब तपासणीस गणेश राऊत ४२९ मतांनी विजयी प्रतिस्पर्धी दुर्गेश जमादार यांना ३०८ मते पडली. सदस्य अॅड. विकास बाबर, अॅड. निलेश घोडेकर, प्रतिभा हगवणे (शिंदे), ज्ञानेश्वर हलगोली, अॅड. गणेश शिंदे, अॅड. प्रसन्ना लोखंडे यांची सदस्यपदी निवड झाली.