पिंपरी (Pclive7.com):- वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भोसरी पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. गेल्या एक महिन्यापासून वडील स्वत:च्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी मुलीच्या वडिलाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैगिंक अत्याचाराचा (पास्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीने फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी १५ वर्षांची असून नववीच्या वर्गात शिकत आहे. गेल्या एक महिन्यापासून तिचे वडील तिच्याशी अश्लील वर्तन करत होते. एक महिना मुलगी शांत राहिली. तरीही, वडिलांचे अश्लील वर्तन सुरुच होते. त्यामुळे शुक्रवारी मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी वडिलाच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वडिलावर गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे.