पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळेनिलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी २७ ऑक्टोबरला त्यांच्याविरोधाच काँग्रेसचे सचिन साठे सांगवी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून कामठे हे फरार असून राजकीय दबावामुळे त्यांना अटक होत नसल्याचा आरोप सचिन साठे यांनी केला आहे.