पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी पिंपरीगावमध्ये तिथी नुसार शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने आणि हजारोंच्या संख्येने साजरा करण्यात येतो. दरवर्षी एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. यावर्षी महिलांसाठी “हर घर दुर्गा” या शौर्यप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये वय वर्ष ५ ते ५५ वयोगटातील सर्व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात स्व-संरक्षण, लाठी काठी, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच योग यांचा समावेश आहे. यासाठी पिंपरी चिंचवड सिलंबम असोसिएशनचे सचिव विजय तेपुगडे मार्गदर्शक आहेत.

हे शिबिर दि. ११ मार्च ते २० मार्च २०२३ पर्यंत सायं. ७ ते ९ पर्यंत पिंपरी गावातील, नवमहाराष्ट्र क्रीडांगणावर सुरू आहे. या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये ९३० हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचा समारोप सोमवारी (दि.२० मार्च) सायंकाळी ७ वाजता शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags: Har Ghar DurgapimpriShivjayantiपिंपरीपिंपरी शिवजयंती महोत्सवच्या 'हर घर दुर्गा' प्रशिक्षणाचा सोमवारी समारोपप्रशिक्षणशिवजयंती महोत्सवसोमवारी समारोपहर घर दुर्गा






















Join Our Whatsapp Group