पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील मासूळकर कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाचे उद्या रविवारी दि.१९ रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात झालेले विविध प्रकल्प, विकासकामांची उद्घाटने रखडली आहे. मात्र, महापालिकेच्या वतीने उद्या चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काही उद्घाटनांचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये पिंपरी येथील मासूळकर कॉलनी येथील शंकरराव मासूळकर अर्बन हेल्थ सेंटर व नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच, कासारवाडी व भोसरीतील गवळीमाथा येथील कचरा हस्तांतरण केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group