व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी, स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी आणि स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

रावेत येथील चॅम्पियन्स् एरिना मैदानावर झालेल्या या सामन्यात मेहक मुल्ला हिने केलेल्या नाबाद ८३ धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीने एसएसए ॲकॅडमीचा १० गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएसए ॲकॅडमी १४४ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रणवी बनसोडे (३७ धावा), तनवी रटकंठीवर (२७ धावा) आणि जान्हवी पोळ (२० धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. हे लक्ष्य व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीने १४.१ सहज पूर्ण केले. मेहक मुल्ला हिने नाबाद ८३ धावा आणि आराध्या पवार (नाबाद ५९ धावा) यांनी सहज धावा जमवून संघाचा विजय यशस्वी केला.
आर्या चिखलीकर हिने केलेल्या ५२ धावांच्या जोरावर स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीने लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीचा ५२ धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. प्रथम खेळणाऱ्या स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीने १७७ धावांचे लक्ष्य उभे केले. आर्या चिखलीकर हिने ५२ धावांची खेळी केली. याशिवाय समिक्क्षा पवार (५० धावा) हिनेसुध्दा अर्धशतकी खेळी केली. याला उत्तर देताना लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १२५ धावांवर मर्यादित राहीला. तनिष्का बागुल हिने ७० धावांची खेळी केली. मेघना मोले हिने नाबाद ३३ धावांची खेळी केली. पण संघाचा विजय दूर राहीला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी रणजीपटू सुभाष रांजणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, समिती सदस्य सुशील जाधव, प्रशांत तेलंगे, आनंद नायडू आणि मुकेश गुजराती आदि मान्यवर उपस्थित होते.
सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएसए ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १४४ धावा (प्रणवी बनसोडे ३७, तनवी रटकंठीवर२७, जान्हवी पोळ २०, श्रृती यादव ४-२८, अवनी पाटील २-१७) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीः १४.१ षटकात बिनबाद १४८ धावा (मेहक मुल्ला नाबाद ८३ (४६, १७ चौकार), आराध्या पवार नाबाद ५९ (३९, ११ चौकार); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः मेहक मुल्ला;
स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद १७७ धावा (आर्या चिखलीकर ५२ (३०, १० चौकार), समिक्क्षा पवार ५० (४५, ७ चौकार) वि.वि. लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १२५ धावा (तनिष्का बागुल ७० (५०, १४ चौकार), मेघना मोले नाबाद ३३ (३५, ६ चौकार), श्रेयसी वाडकर २-७); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः आर्या चिखलीकर

















Join Our Whatsapp Group