पिंपरी (Pclive7.com):- शिक्षणामुळेच बहुजनांची प्रगती झाली व समाजात त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रतिष्ठा मिळाली. यासाठी तरुणांना उच्च शिक्षण व वैद्यकीय, अभियांत्रिकीचे व्यवसायिक शिक्षण मिळाले पाहिजे. म्हणून सरकारने देखिल अनुकूल धोरण राबविले पाहिजे या उद्देशाने स्व. मुख्यंमत्री वसंतदादा पाटील यांनी प्रशासन राबविले. वसंतदादा पाटील हे उत्तम प्रशासक आणि उत्तम संघटक असणारे बहुजन समाजातील व्यक्तीमत्व होते. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सहकार भूषण ही पदवी देण्यात आली होती. देशात महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात कायम प्रगतीपथावर असावे यासाठी त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले. या शब्दात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी स्व. वसंतदादा पाटील यांना अभिवादन केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सांगवीतील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटी माजी अध्यक्षा शामला सोनवणे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुदाम ढोरे, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, शेषराव कसबे, भाऊसाहेब मुगूटमल, विश्वनाथ खंडागळे, किसन भालेकर, सनी कसबे, संदेश नवले, अजय खराडे आदी यावेळी उपस्थित होते.