पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडचे महापौर बदललेत… खोटे वाटतेय…पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने छापलेल्या बॅनरने तर सिद्ध होतेय… आज क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर चक्क शैलजा मोरे यांचे नाव महापौर म्हणून छापण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना महापौर केंव्हा बदलेल असा प्रश्न पडला होता…!
पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनतासंपर्क विभाग कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची पत्रिका चक्क तीन वेळा छापण्याची किमया या विभागाने केली होती. तर आज चक्क पिंपरी चिंचवडचे महापौर बदलून ठिसाळ कारभाराचे दर्शन या विभागाने दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर बॅनरवर लावण्यात होता. मात्र त्यात उपमहापौर असलेल्या शैलजा मोरे यांच्या नावाचा उल्लेख महापौर म्हणून करण्यात आला होता. त्यामुळे पिंपरीचे महापौर बदलले कधी असा प्रश्न उपस्थितांना पडला होता.