भोसरी (Pclive7.com):- गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अज्ञातांनी खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) घरकुल चिखली येथे उघडकीस आली.
याप्रकरणी मृत मुलीच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी शनिवारपासून बेपत्ता होती. दरम्यान, पोलिस शोध घेत असताना मंगळवार (दि. ४) चिखली परिसरात एका पडक्या इमारतीत अज्ञातांनी तिचा खून केल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.