पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरावर सक्तवसुली संचालनालया (ईडी) च्या पथकाने जानेवारी महिन्यात छापा मारला. त्यानंतर पुन्हा त्याच प्रकरणात मंगळवारी (दि. ४) आणखी ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत.

जानेवारीमध्ये झालेल्या कारवाईत ईडीने बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी शेकडो कागदपत्रे तसेच इतर मालमत्तांची चौकशी केली होती. गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने ईडीने दोन महिन्यांच्या अवकाशानंतर पुन्हा काही ठिकाणी छापे मारले.

मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत बँकेशी संबंधित काही व्यक्ती व त्यांच्या नातेवाइकांची तसेच इतर चौकशी करण्यात आली. मात्र, ईडीने कोणती आणि किती संपत्ती जप्त केली, किती आणि कोणती कागदपत्रे ताब्यात घेतली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.






















Join Our Whatsapp Group